अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:00+5:302021-09-09T04:27:00+5:30

शिक्षक भारती व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ सप्टेंबर रोजी पुणे येथे कार्यकर्ता शिबिर आयोजित ...

To solve the problems of teachers in Ahmednagar district | अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविणार

अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविणार

शिक्षक भारती व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ सप्टेंबर रोजी पुणे येथे कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर व जिल्हा हिशेब तपासणी संजराज बोंतले यांनी सक्रिय सहभाग नोंदवून अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्न आमदार कपिल पाटील यांच्यासमोर मांडले. संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, ज्युनिअर कॉलेज युनिट राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, धनाजी पाटील, प्राथमिक विभाग राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, उपाध्यक्ष दिनेश खोसे, महेश पाडेकर, संजराज बोधले, तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजना, बी.डी.एस. प्रणाली, सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना, एक तारखेला पगार होणे, विनाअनुदान धोरण रद्द करणे, एकस्तर वेतनश्रेणी, विनाअट वरिष्ठ निवड श्रेणी, शिक्षकांचे वेतन प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये करणे अशा विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा आमदार कपिल पाटील यांनी केली. नगर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर यांचे प्रश्न लवकरच सोडवणार, असे आश्वासन आ. पाटील यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, जितेंद्र आरू, उपाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, माध्यमिक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहंमद समी, शेवगाव तालुकाध्यक्ष मफीज इनामदार, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सचिन लगड, संगमनेर तालुकाध्यक्ष अमोल वर्पे, श्रीगोंदा महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे, रुपाली कुरूमकर, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, राजेंद्र जाधव, सुदाम दिघे, संभाजी पवार, संतोष शेंदूरकर, कैलास जाधव, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, संजय पवार, सुदर्शन ढगे, योगेश हराळे, संतोष देशमुख आदींनी केले.

-------

फोटो - ०८ शिक्षक भारती शिबिर

शिक्षक भारती व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार कपिल पाटील, महेश पाडेकर आदी.

Web Title: To solve the problems of teachers in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.