अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:14+5:302021-02-11T04:23:14+5:30

सहाय्यक आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अहमदनगर व भा. पां. हिवाळे शैक्षणिक संस्थेचे सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय ...

Social workers should take initiative to eradicate superstition | अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा

सहाय्यक आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अहमदनगर व भा. पां. हिवाळे शैक्षणिक संस्थेचे सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. देवढे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे, ‘लोकमत’चे अहमदनगर आवृतीप्रमुख सुधीर लंके व्यासपीठावर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रकल्प विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

प्रास्ताविकात डाॅ. सुरेश पठारे म्हणाले, अंधश्रद्धा समाजामध्ये खोलवर रुजलेली आहे. समाज प्रबोधनासाठी सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाने नेहमी पुढाकार घेतला आहे. यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी सीएसआरडी प्रयत्नशील राहील.

प्रमुख पाहुणे देवढे म्हणाले की, कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांना याबाबत प्रशिक्षित करणे आवश्यक असून येणाऱ्या दिवसात समाजकल्याण विभागाच्या वतीने सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या सहयोगाने विविध समाजप्रबोधन उपक्रम राबविण्यात येतील. सुधीर लंके म्हणाले, संतांनी व समाजसुधारकांनी वेळोवेळी वाईट चालीरीती व अंधश्रद्धा यांना विरोध केला. आता पत्रकारिता करताना माध्यमांनी या घटनांकडे संवेदनशीलपणे पाहणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव, प्रशांत पोतदार, गणेश चिंचोळे, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल व प्रा. प्रदीप जारे आदींनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

------------

फोटो - १०सीएसआरडी

सीएसआरडी येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण कार्यशाळेत बोलताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे.

Web Title: Social workers should take initiative to eradicate superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.