नगर जिल्ह्यात आतापर्यंत ६३४ रुग्ण बरे होऊन घरी; आज २७ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:43 IST2020-07-12T17:42:28+5:302020-07-12T17:43:17+5:30
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (१२ जुलै) सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत ६३४ रुग्ण बरे होऊन घरी; आज २७ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी (१२ जुलै) सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या २३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३०३ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९५७ इतकी झाली आहे. आजच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.
शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार बाधित आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये नगर शहरातील २५, नेवासा आणि संगमनेर येथील एक रुग्ण आढळून आला होता, असे जिल्हा सामान्य रुगणालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.