सहा हजार मतदान यंत्रे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:41+5:302021-01-15T04:18:41+5:30

जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतून किंवा तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या ठिकाणांहून मतदान साहित्य गुरुवारी रवाना करण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच साहित्य ...

Six thousand voting machines dispatched | सहा हजार मतदान यंत्रे रवाना

सहा हजार मतदान यंत्रे रवाना

जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतून किंवा तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या ठिकाणांहून मतदान साहित्य गुरुवारी रवाना करण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच साहित्य घेण्यासाठी नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क लावलेले होते. मात्र, मतदान साहित्य वाटपाच्या वेळी साहित्य घेण्यासाठी आलेले कर्मचारी गर्दी करून मंडपात थांबलेले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. ७०५ ग्रामपंचायतीसाठी ३०२१ बॉलेट युनिट, तर २ हजार ९११ कंट्रोल युनिट असे एकूण ५ हजार ९३२ मतदान यंत्रे रवाना करण्यात आली.

-----------

सण सोडून महिला कर्तव्यावर

गुरुवारी मकर संक्रांतीचा सण होता. मात्र, अनेक महिलांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. घरचा सणवार सोडून महिलांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. मतदान साहित्य घेण्यासाठी महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-----------------

असे वाटप झाले साहित्य

मतदान केंद्र- २५५३

बॉलेट युनिट-३०२१

कंट्रोल युनिट-२९११

मेमरी-२८१३

पट्टीसील-८४५९

पेपरसील-८४५९

स्पेशल टॉग-८४५९

पीतळी सील-२७९८

मार्कर पेन-७७९५

---

फोटो

Web Title: Six thousand voting machines dispatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.