आरोपीकडे आढळले सहा सीमकार्ड

By Admin | Updated: May 8, 2023 17:50 IST2014-05-09T00:43:06+5:302023-05-08T17:50:28+5:30

अहमदनगर: जितेंद्र भाटिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याच्याकडे आणखी सहा सीमकार्ड असल्याचे गुरुवारी पोलीस तपासात आढळून आले़

Six SIM cards found by the accused | आरोपीकडे आढळले सहा सीमकार्ड

आरोपीकडे आढळले सहा सीमकार्ड

 अहमदनगर: जितेंद्र भाटिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याच्याकडे आणखी सहा सीमकार्ड असल्याचे गुरुवारी पोलीस तपासात आढळून आले़ याविषयी कंपनीकडे माहिती मागविली आहे़ तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र भाटिया यांची पत्नी दिव्यासह आरोपीला पिस्तूल पुरवणार्‍या गोट्या बेरडला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र भाटिया खून प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे़ भाटिया यांचा खून प्रेमसंबंधातून केल्याची कबुली प्रदीप कोकाटे व दिव्या भाटियाने दिली आहे़ दिव्या भाटिया ही जितेंद्र भाटिया यांची पत्नी आहे़ तिने प्रेमसंबंधातून खून केल्याची स्पष्ट कबूली पोलिसांना दिली आहे़ या प्रकरणातील आरोपी प्रदीप याच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे़ आरोपीकडे आणखी बरेच सीमकार्ड असल्याचा पोलिसांचा संशय खरा ठरला़ आरोपीकडे विविध कंपनीचे आणखी सहा सीमकार्ड असल्याचे तपासात गुरुवारी उघड झाले़ हे सीमकार्ड आरोपीने रस्त्यावरील कंपनीच्या स्टॉलवरून खेरदी केल्याचे उघड झाले आहे़ परंतु कंपनीने एकाच वेळी एवढे सीमकार्ड कशाच्या अधारे दिले, याची माहिती संबंधित कंपनीकडे केली आहे़ तसे पत्र कंपनीला देण्यात आल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी दिली़ सीमकार्डच्या तपासातून या प्रकरणातील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी) दिव्याचा भाऊ हेमंतला क्लीनचिट भाटिया खून प्रकणातील मुख्य सूत्रधार दिव्या हिचा भाऊ हेमंत सचदेव यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ आरोपी प्रदीपने हेमंतशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता़ परंतु हेमंतचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे उघड झाले़ त्यामुळे हेमंत सचदेव याला पोलिसांनी क्लीनचिट दिली़ दिव्याला आज न्यायालयात हजर करणार भाटिया खून प्रकणातील मुख्य सूत्रधार भाटियांची पत्नी दिव्या भाटिया असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़ दिव्याने तशी कबूली पोलिसांना दिली आहे़ दिव्याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे़ त्यामुळे दिव्याला पुन्हा शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ दिव्याकडून आणखी काही माहिती उपलब्ध झाली नाही़ मात्र प्रदीपने दिव्याला दिलेले सिमकार्ड पोलिसांच्या हाती लागले नाही़ हे सिमकार्ड शोधण्याची पोलिसांची मोहीम सुरू आहे़

Web Title: Six SIM cards found by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.