मुंबईतून संगमनेरात भावासोबत आलेल्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 13:31 IST2020-05-26T13:28:32+5:302020-05-26T13:31:51+5:30
विक्रोळीहून (मुंबई) भावासोबत संगमनेरात आलेल्या ६८ वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण होवून सोमवारी रात्री मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने या महिलेला अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच या महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

मुंबईतून संगमनेरात भावासोबत आलेल्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू
संगमनेर : विक्रोळीहून (मुंबई) भावासोबत संगमनेरात आलेल्या ६८ वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण होवून सोमवारी रात्री मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने या महिलेला अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच या महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
कोरोनाची लागण होवून मृत्यू झालेली महिला मूळची विक्रोळी येथील रहिवासी होती. ती आजारी असल्याने तिचा संगमनेरात राहणारा भाऊ तिला घेण्यासाठी गेला होता. येताना तिला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात तिला उपचारार्थ दाखल केले. परंतू प्रकृती गंभीर झाल्याने तिला अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अहवाल आल्यानंतर या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सदर महिलेच्या संपर्कातील तिघांना जिल्हा रूग्णालयात पाठवत तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यात तिचा भाऊ, संगमनेर शहरातील खासगी रूग्णालयातील कर्मचारी व संगमनेरातून अहमदनगर येथे तिला ज्या रूग्णवाहिकेतून नेण्यात आले तिचा चालक. अशा तिघांचा यात समावेश आहे.