शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आमच्या भागात मोबाईल केव्हा वाजणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST

राजूर : जुन्नरच्या आमदार, खासदारांनी अकोले तालुक्यातील फोफसंडी या दुर्गम भागात मोबाईलची रेंज आणली. आता आमच्याच अकोले तालुक्यातील आमदार, ...

राजूर : जुन्नरच्या आमदार, खासदारांनी अकोले तालुक्यातील फोफसंडी या दुर्गम भागात मोबाईलची रेंज आणली. आता आमच्याच अकोले तालुक्यातील आमदार, खासदारांनी आदिवासी दुर्गम भागातील कुमशेत, पाचनई, आंबित व परिसरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या भागातील सरपंच आणि ग्रामस्थांमधून होत आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात सुरू असलेल्या मोबाईल नेटवर्किंगच्या प्रश्नामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासाचा खेळखंडोबा होत आहे. यावर लोकमत सातत्याने आवाज उठवत आहे. अकोले तालुक्यातील फोफसंडी येथील ऑनलाईन अभ्यासाची वस्तुस्थिती मांडणारे वृत्त काही दिवसांपूर्वी लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत जुन्नर (जि. पुणे) येथील आमदार वल्लभ बेनके आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फोफसंडी या दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले. यानंतर आता किमान आमच्या तालुक्यातील आमदार डॉ. किरण लहामटे आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी कुमशेत, पाचनई, धामनवन, शिरपुंजे, आंबित व परिसरातील गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

................

अभ्यासाचा प्रश्न मिटविण्यासाठी एवढे कराल का?

फोफसंडीसारख्या अतिदुर्गम भागात मोबाईलची रेंज आली. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जुन्नरच्या आमदार, खासदारांनी प्रयत्न केले. आता आमच्या आमदार, खासदारांनी दुर्गम आदिवासी भागातही अशी मोबाईल रेंज आणावी. यामुळे आमच्या लेकरांना ऑनलाईन अभ्यासासाठी डोंगराच्या पायवाटा तुडवाव्या लागणार नाहीत. आमचे आमदार, खासदार मुलांच्या शिक्षणासाठी किमान एवढे तरी काम कराल का, असा सवाल कुमशेतचे सरपंच सयाजी असवले, पाचनईचे सरपंच पर्वताबाई घोगरे व इतर गावच्या सरपंच यांनी केला आहे.