विहिरीत पाय घसरून पडल्याने भावंडांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:06 IST2020-11-14T12:05:36+5:302020-11-14T12:06:04+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही.

विहिरीत पाय घसरून पडल्याने भावंडांना जलसमाधी
श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही. कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणाऱ्या कांतीलाल सोनवणे यांची दोन लहान मुले आविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे हे दोघे घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना पाय पाय घसरून पडले. ते बराच वेळ आढळून न आल्याने सोनवणे परिवाराने आपल्या लेकरांची शोधमोहीम सुरू केली. यातील आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना घटना घडल्याचे कुटुंबीयांना सायंकाळी उशिरा लक्षात आले. विहरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने चार वर्षीय कार्तिक याचा मृतदेह सापडत नसल्याने मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत केले. शनिवारी रात्री दोन वाजता कार्तिकचा मृतदेह विहीरातून बाहेर काढण्यात आला. या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून आई-वडीलांनी हंबरडाच फोडला. |