शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोर शिरजोर... पोलीस बिनघोर

By admin | Updated: December 15, 2015 23:12 IST

अहमदनगर : शहरात वाहनांच्या चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात सात ते आठ वाहने चोरीला गेली होती.

अहमदनगर : शहरात वाहनांच्या चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात सात ते आठ वाहने चोरीला गेली होती. त्यानंतर रविवार-सोमवारी पुन्हा चोरट्यांनी सात ते आठ वाहने चोरली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने वाहने चोरणारी जुनी टोळी गजाआड केली असली तरी त्याच टोळीतील जामिनावर सुटलेले आरोपी आणि नव्या टोळ््यांमुळे वाहन चोरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. नगर शहरात वाहनांची पार्किंग करण्यासाठी मोजक्याच जागा आहेत. शासकीय कार्यालयाच्या जागेत खासगी संस्थांनी पार्किंगचे ठेके घेतले आहेत. तिथे पैसे आकारले जात असल्याने नागरिक कार्यालयाच्या बाहेरच वाहने पार्किंग करीत आहेत. एस.टी. बसस्थानकात पार्किंगची सुविधा असली तरी तात्पुरत्या कामासाठी जाणाऱ्या लोकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जातात. न्यायालय, कापड बाजार, मार्केट यार्ड, चितळे रोड, दाळमंडई आदी ठिकाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी, नागरिक येतात. त्यांच्या रस्त्यावर लावलेल्या वाहनांची चोरी होत आहे. नगर-कल्याण रोडवर लावलेली सोमेश्वर मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली सागर किशोर जाधव (रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) यांची १ लाख १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात इसमांनी ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत चोरली. परसराम मारोती बरबडे (रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांची १ लाख १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल कोर्ट गल्लीतून चोरीला गेली. भगवान विठ्ठल वाणी (रा. वाणीनगर) यांची ३ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरली. वाणी यांनी त्यांचे वाहन घराजवळच्या गोठ्यात लावले होते. वैभव सीताराम आव्हाड (रा. शिवनगर, पिंपळगाव रोड) यांची २ लाख ६० हजार रुपये किमतीची कार घरासमोर उभी केली होती. ही कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. (प्रतिनिधी)