श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिर परिसराचा कायापालट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:51+5:302021-03-17T04:20:51+5:30
पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर हे तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ...

श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिर परिसराचा कायापालट होणार
पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर हे तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे प्रत्येक सोमवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. प्राचीन देवस्थानच्या मंदिर परिसरात जुन्या काळातील कोरीव दगड बसविण्याचे काम सुरू आहे. परिसरातील घाटसिरस, कान्होबावाडी, पारेवाडी अशा ठिकाणाहून १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या पडलेल्या वाड्यांचा दगड या बांधकामासाठी वापरण्यात येत असल्याने मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. या दगडी बांधकामामुळे मंदिर व परिसराचे जणू रूपच बदलत आहे.
याकामी देवस्थानचे ट्रस्टी, तसेच गणेश पालवे, भाऊसाहेब पाठक, जनार्दन पाठक, आबासाहेब पाठक, लक्ष्मण पाठक, बाबासाहेब डोंगरे, व्यवस्थापक शिवाजी पालवे, मुरलीधर पालवे, पोपटराव चोथे, शरद पडोळे, ज्ञानेश्वर पाठक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
......
परिसरातील जुन्या पडलेल्या वाड्यांचे कोरीव दगड आणून श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिर परिसराचे बांधकाम प्रगतिपथावर असून, लवकरच मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.
- गणेश पालवे, सरपंच घाटसिरस
१६ करंजी