एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:13 IST2021-02-11T13:12:03+5:302021-02-11T13:13:03+5:30
अहमदनगर : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी पूर्वनियोजित दौरा होता. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होत्या. त्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कमान लावण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरही शिवसेनेने फलक लावले आहेत. त्यांना असे फलक लावण्यासाठी कोणी परवानगी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान
अहमदनगर : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी पूर्वनियोजित दौरा होता. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होत्या. त्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कमान लावण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरही शिवसेनेने फलक लावले आहेत. त्यांना असे फलक लावण्यासाठी कोणी परवानगी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मंत्री शिंदे यांचा गुरुवारी नियोजित दौरा होता. नगरपालिका आणि महापालिकेच्या कामाकाजाशी संबंधित ते बैठका घेणार होते. मात्र त्यांचा गुरुवारचा दौरा रद्द झाला असून ते आता शुक्रवारी येणार आहेत. दरम्यान मंत्री शिंदे येणार असल्याने शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कमानीवरच शिंदे यांचे फलक लावण्यात आले आहेत. एरवी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यास, फलक लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासकीय इमारतीवरच फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त झाले आहे. आता जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.