शिवसेना पदाधिकारी दिलेला शब्द पाळतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:31+5:302021-04-08T04:21:31+5:30
निघोज : दिलेला शब्द पाळणे, ही शिवसेना पदाधिकाऱ्यांची ख्याती आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांनी केले. ...

शिवसेना पदाधिकारी दिलेला शब्द पाळतात
निघोज : दिलेला शब्द पाळणे, ही शिवसेना पदाधिकाऱ्यांची ख्याती आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांनी केले.
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे स्मशानभूमीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्मशानभूमीसाठी जमीन देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
वाजेवाडी येथे कोल्हापूर पद्धतीचा १५ लाख रुपये खर्चाच्या बंधाऱ्याचेही भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, युवा सेनाप्रमुख नितीन शेळके, सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, माजी सरपंच रेखा येवले, स्वाती नऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य रमेश वाजे, आशाबाई चौधरी, शिवा पवार, संतोष वाजे, बाळासाहेब वाजे, दशरथ बोचरे, प्रदीप बोचरे, बाबाजी बोचरे, संतोष बोचरे, गणेश वाजे, ज्ञानेश्वर वाजे, रामदास वाजे, बाबाजी वाजे, दत्ता वाजे, विजय वाजे, जयवंत बोचरे, गोरख बोचरे, लक्ष्मण मुरकुटे, राजेंद्र उंडे, संपत वाजे, आनंद वाजे, विष्णू वाजे, सतीश वाजे, भाऊसाहेब येवले, ग्रामसेवक हरिश्चंद्र काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास वाजे यांनी केले. पांडुरंग येवले यांनी आभार मानले. वाजेवाडी येथील ग्रामस्थांची मागणी काशीनाथ दाते यांनी पूर्ण केली.
--
०७ वडनेर
वडनेर बुद्रुक येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन करताना विजय औटी व इतर.