शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षात तीनशे वेळा शिर्डीची वारी, सत्तावीस वेळेस रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 14:07 IST

शिवप्रिया पुण्याच्या टाटा वाहन उद्योगात संशोधन विभागात व्यवस्थापक पदावर आहे़ केवळ साईदर्शनासाठी पुण्यात नोकरी करणाऱ्या शिवप्रियाने सप्टेंबर २००९ पासुन पुण्यात नसतांनाचे अपवाद वगळता

ऑनलाइन लोकमतशिर्डी, दि. १७ : मुळची चेन्नईची व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेली शिवप्रिया आपल्या आगळ्यावेगळ्या भक्तीने साईप्रिया बनली आहे़शिवप्रिया पुण्याच्या टाटा वाहन उद्योगात संशोधन विभागात व्यवस्थापक पदावर आहे़ केवळ साईदर्शनासाठी पुण्यात नोकरी करणाऱ्या शिवप्रियाने सप्टेंबर २००९ पासुन पुण्यात नसतांनाचे अपवाद वगळता प्रत्येक आठवड्याला साईदरबारी हजेरी लावली आहे़ गेल्याच आठवड्यात तीच्या तब्बल तीनशे वाऱ्या पुर्ण झाल्या़ विशेष म्हणजे प्रत्येक तीन महिन्यातुन एकदा ती साईदरबारी रक्तदानही करत असते़ या माध्यमातुन तीने आजवर सत्तावीस वेळेस रक्तदान केले आहे़ 

तीनशे वाऱ्याचे औचित्य साधुन तीने गेल्या आठवड्यात तीनशे भाविकांना शिऱ्याचा नास्ता दिला तर आज संस्थान रूग्णालयाला दोन हिमोग्लोबीन अनालायझर व आठ रक्तदाब तपासणी यंत्र भेट दिले़ संस्थान रक्तपेढीचे डॉ़ सुर्यकांत पाटील यांनी ही देणगी स्विकारली़ यावेळी विठ्ठल शिरसाठ,अजित क्षिरसागर,सुनिल कर्जुले,अशोक सातभाई, गंगाधर घारे,सुनिल निकम,कांचन इल्हे,सौरभ मेढे,निलेश मोरे व संस्थानचे पुजारी बाळासाहेब जोशी उपस्थीत होते़ 

गेल्या सहा महिन्यापुर्वीही जवळपास एक लक्ष रूपये किमतीचे इसीजी मशिनही तीने साईनाथ रूग्णालयाला अर्पण केले होते़ प्रत्येक आठवड्याला येणारी शिवप्रिया त्या दिवशी साईबाबांच्या हारांसाठी बाजारातुन फुले खरेदी करून संस्थानच्या हार बनवणारया विभागाला देत असते़ गेल्या तीन वर्षांपासुन ती संस्थानच्या सुरक्षा विभागातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना दिवाळीला प्रत्येकी दोन साड्या भेट देत असते़ यंदा तीन येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील सर्व एकशे पाच वृद्धांना कपडे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश भेट दिले होते़ लक्ष्मीवाडी येथील शाळेसाठीही तीने खोल्या बांधण्यासाठी आर्थिक मदत केली होती़ आयुष्यात साईबाबांना सर्वस्व मानणाऱ्या शिवप्रियाला शिर्डीकर होण्याची व आपला अंत येथेच व्हावा अशी आंतरीक इच्छा आहे़.