कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे क्र. ०६२३७ / ०६२३८ ही म्हैसूर-साईनगर शिर्डी-म्हैसूर गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या आणि साईभक्तांच्या सुविधांसाठी ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जुलैपासून पुढील आदेश होईपर्यंत ही विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार आहे. ही रेल्वे म्हैसूर स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक सोमवारी पहाटे साडेपाच वाजता सुटेल. शिर्डी स्थानकावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचेल.
साईनगर शिर्डी स्थानकावरून ही आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि म्हैसूर स्थानकावर गुरुवारी पहाटे ४.४० वाजता पोहोचेल. कोविड संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वेगाडीत व रेल्वेस्थानकांवर केले जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.