शेवगाव तालुक्यात महिलांचेच पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:44+5:302021-02-05T06:35:44+5:30

शेवगाव : तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले असून त्यात ४८ ठिकाणी महिला तर ४६ ठिकाणी ...

In Shevgaon taluka, the burden of women is heavy | शेवगाव तालुक्यात महिलांचेच पारडे जड

शेवगाव तालुक्यात महिलांचेच पारडे जड

शेवगाव : तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले असून त्यात ४८ ठिकाणी महिला तर ४६ ठिकाणी पुरुष सरपंच होणार आहेत. तर नुकत्याच झालेल्या ४८ ग्रामपंचायत सदस्यांत आरक्षणानुसार सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

तालुक्यातील २०२० ते २०२५ कालावधीसाठी ९४ ग्रामपंचयतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. २८) उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, नायब तहसीलदार मयूर बेरड यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ९४ ग्रामपंचायतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण महिला - चेडेचांदगाव, खानापूर, भातकुडगाव, वाघोली, वडुले बु., बाभुळगाव, वडुले खु., भगुर, पिंगेवाडी, कुरुडगाव, थाटे, मुंगी, ढोरजळगाव शे., बोडखे, भायगाव, सुलतानपूर खु., खडके, राक्षी, ठाकूर निमगाव, दादेगाव, बऱ्हाणपूर, आखेगाव, तळणी, एरडगाव, मंगरुळ बु., लोळेगाव, बेलगाव, खानापूर, शहरटाकळी.

सर्वसाधारण व्यक्ती - शेकटे बु., लखमापुरी, अंतरवाली बु., ढोरसडे, वाडगाव, अंतरवाली खु.शे., हिंगणगाव ने., मडके, आखतवाडे, सामनगाव, माळेगाव ने., वरुर, लाडजळगाव, निंबेनांदुर, ठाकूर पिंपळगाव, बक्तरपूर, हातगाव, हसनापूर, रांजणी, चापडगाव, जुने दहिफळ, कोनोशी, सुकळी, दहिगाव शे., विजयपूर, ताजनापूर, खरडगाव, देवटाकळी. नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती - शेकटे खु., कोळगाव, भावी निमगाव, ढोरजळगाव ने., खुंटेफळ, वरखेड, बालमटाकळी, सोनेसांगवी, अमरापूर, गदेवाडी, लाडजळगाव, कांबी, दहिगाव शे., नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - नवीन खामपिंप्री, खामगाव, आव्हाणे खु., जोहरापूर, घोटण, शिंगोरी, दिवटे, राणेगाव, एरंडगाव भा., कऱ्हेटाकळी, सुलतानपूर बु., बोधेगाव, मजलेशहर, अनुसूचित जाती (व्यक्ती) - आधोडी, मेळगाव शे., मंगरूळ खु., प्रभुवाडगाव, आव्हाणे बु., अनुसूचित जाती महिला - नागलवाडी, सालवडगाव, लाखेफळ, दहिगाव ने., सोनविहीर, अनुसूचित जमाती महिला - नवीन दहिफळ.

Web Title: In Shevgaon taluka, the burden of women is heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.