भाजपाकडून सात बंडखोरांची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:47 IST2018-12-05T13:05:33+5:302018-12-05T14:47:23+5:30

महापालिका निवणुकीमध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याने भाजपने ७ जणांवर कारवाई केली आहे. या सातही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे

Seven insurgents captured by the BJP | भाजपाकडून सात बंडखोरांची हकालपट्टी

भाजपाकडून सात बंडखोरांची हकालपट्टी

अहमदनगर : महापालिका निवणुकीमध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याने भाजपने ७ जणांवर कारवाई केली आहे. या सातही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपाचे संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांनी ही कारवाई केली. या सातही जणांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी कायम ठेवली आहे.
हकालपट्टी केलेल्यामध्ये मिलींद गंधे, मनिषा राजेंद्र काळे-बारस्कर, गायत्री चोरडीया, प्रितेश गुगळे, प्रतिक बारसे, शिवाजी लोंढे, आशा विधाते यांचा समावेश आहे. मिलींद गंधे प्रभाग ४ मधून, काळे-बारस्कर प्रभाग-६ मधून, चोरडीया प्रभाग- १५ मधून, बारसे प्रभाग १६ मधून, शिवाजी लोंढे प्रभाग-१७ मधून, आशा विधाते प्रभाग १६ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: Seven insurgents captured by the BJP