वृद्धेश्वर कारखान्यासाठी सात अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:39 IST2021-01-12T11:38:56+5:302021-01-12T11:39:38+5:30

पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी सात अर्ज दाखल झाले.

Seven applications filed for Vriddheshwar factory | वृद्धेश्वर कारखान्यासाठी सात अर्ज दाखल

वृद्धेश्वर कारखान्यासाठी सात अर्ज दाखल

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी सात अर्ज दाखल झाले.

    एकाच दिवशी तब्बल ८० अर्जांची विक्री झाली. कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिला,

दुसरा दिवस निरंक राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी सहाजणांनी सात अर्ज दाखल केले आहेत. तर तब्बल ८० अर्जांची विक्री झाली आहे.

Web Title: Seven applications filed for Vriddheshwar factory