अकोलेत साडेसात लाखांचा गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:26 IST2021-05-20T16:25:19+5:302021-05-20T16:26:20+5:30
तालुक्यातील प्रवरा परिसरातील मेहेंदुरी गावशिवारात उसाच्या शेतात साडेसात लाख रुपये किमतीची बेकायदा लावलेली गांजाची झाडे अकोले पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकून केलेल्या कारवाई हस्तगत केली.

अकोलेत साडेसात लाखांचा गांजा हस्तगत
अकोले : तालुक्यातील प्रवरा परिसरातील मेहेंदुरी गावशिवारात उसाच्या शेतात साडेसात लाख रुपये किमतीची बेकायदा लावलेली गांजाची झाडे अकोले पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकून केलेल्या कारवाई हस्तगत केली. याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई करत गांजाची झाडे हस्तगत केली आहे.
हिरव्या गांजा पाल्याचे वजन साधारण ७५ किलो आहे. रोडाजी ऊर्फ रोहिदास रामभाऊ पथवे (रा. बहिरवाडी, ता.अकोले) यांचे उसाच्या शेतात गांजाची १२ ते १५ झाडे मिळून आली आहे. रात्री गुन्हा दाखल करण्यात आला व रोहिदास रामभाऊ पथवे यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार करत आहेत.