शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

तीळ-गुळाचा भाव बाजारात स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

नेहमीप्रमाणे यंदा मकरसंक्रांत १४ जानेवारीला आहे. साधारणपणे एक जानेवारीनंतर मकरसंक्रांतीचे वेध लागतात. मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आढावा घेतला असता तीळ, ...

नेहमीप्रमाणे यंदा मकरसंक्रांत १४ जानेवारीला आहे. साधारणपणे एक जानेवारीनंतर मकरसंक्रांतीचे वेध लागतात. मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आढावा घेतला असता तीळ, गुळ आणि साखरेचे दर स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. राज्यात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. त्यामुळे साखरेचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर स्थिर आहेत. सध्या तीन हजार रुपये प्रति क्विंटल साखरेचा दर आहे. गत महिन्यात आणि सध्याही हेच दर असून ते स्थिर आहेत. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साखर, गूळ आणि तीळाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान सध्या तेलाचे भाव मात्र वाढले असून १२० ते १३४ रुपये प्रतिकिलो आहेत.

-------------

साखरेचे दर टिकून आहेत. सध्या साखरेचा साठा मुबलक प्रमाणात आहे. राज्यात उसाचे पीक जोमात आहे. तसेच गतवर्षी साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. बाजारातही फारशी मागणी नाही. लग्नसराई सुरू असली तरी कमी उपस्थितीमध्ये लग्नकार्य होत आहेत. त्यामुळे साखरेला पूर्वीइतकी मागणी नाही.

-कमलेश भंडारी, साखरेचे ठोक व्यापारी

----------------

कोरोनामुळे सुट्टा किंवा मोकळा गूळ घेण्यापेक्षा ग्राहक एक किलोची ढेप किंवा छोट्या आकाराच्या ढेपांना मागणी करीत आहेत. सध्या हा गूळ किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला आणखी २० दिवस आहेत. तोपर्यंत बाजारात साखर, गुळ, तिळाची मागणी वाढेल व दरही वाढण्याची शक्यता आहे.

-संजय साखरे, किराणा मालाचे व्यापारी

------------

तीळ भाव

नगरच्या बाजारात सध्या तिळाचा भाव १४० रुपये किलो आहे. हा भाग गेल्या काही दिवसांपासून तेवढाच आहे. सध्या तिळाला एवढी मागणी नाही. एक जानेवारीनंतर मागणी वाढून तिळाचे भाव आणखी वाढतील. गतवर्षी ऐन संक्रांतीच्या काळात तीळाचा भाव २०० रुपये किलोपर्यंत गेला होता.

-------------

गुळ भाव

गुळाचा भावही १० रुपये कमी किंवा जास्त होतो. तसेच सध्या गुळाचेही भाव स्थिर आहेत. किरकोळ बाजारात गूळ ५० ते ५५ रुपये किलोने मिळतो. रासायनिक गुळापेक्षा सेंद्रिय गुळाचा भाव १० ते २० रुपयांनी जास्त आहे.

----------

साखर

ठोक बाजारात साखरेला ३ हजार रुपये क्विंटल (अधिक जीएसटी) दर आहे. किरकोळ बाजारात गत महिन्यात ३८ रुपये किलो असलेली साखर आणखी दोन ते चार रुपयांनी कमी झाली आहे. चांगली साखर ३५ ते ३६ रुपये किलो मिळते. साखरेच्या प्रतवारीनुसार साखरेचा दर कमी जास्त आहे.

---------

नेटफोटोत- २४ संक्रांत डमी

फोटो- २४ तीळगूळ