तरुणाई सरसावली रुग्णांच्या सेवेसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST2021-04-23T04:21:43+5:302021-04-23T04:21:43+5:30
श्रीगोंदा : कोरोनाची वाढती संख्या सर्वांचीच डोकेदुखी बनत आहे. ऑक्सिजन रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. हाॅस्पिटल कोरोना सेंटर ...

तरुणाई सरसावली रुग्णांच्या सेवेसाठी
श्रीगोंदा : कोरोनाची वाढती संख्या सर्वांचीच डोकेदुखी बनत आहे. ऑक्सिजन रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. हाॅस्पिटल कोरोना सेंटर हाऊस फुल्ल झाली आहेत, अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी तरुणाई सरसावली आहे.
१० एप्रिलला कोरोनाचे ३८५ ॲक्टिव्ह रुग्ण तर २० एप्रिलला ही संख्या ७३२ वर पोहाेचली. दहा दिवसात १५ बळी गेले.
कोळगाव, घारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, पिंपळगाव पिसा व श्रीगोंदा येथे सेवाभावी संस्थांनी कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. कोरोना सेंटरमधील रुग्ण वाढले. स्थानिक डाॅक्टर कोविड सेंटरमध्ये तासाला भेट देत आहेत.
कोरोनाची भयानक परिस्थिती पाहून लहान लहान गावात लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु केले परंतु तालुक्याची आर्थिक व राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या काष्टीत मात्र कोविड सेंटर सुरु करण्यावर उदासीनता दिसत आहे.
.......
ना औषध, ना रुग्णवाहिकेत इंधन
शासनाकडे यंत्रणा आहे, पण निधीची अडचण आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील औषधे व इतर साहित्य संपले. डिझेल अभावी रुग्णवाहिका, वाहने बंद आहेत त्यामुळे नगरवरून लस टेस्टिंग आणण्यासाठी अधिकाऱ्यांना हात पसरण्याची वेळ आली आहे. या खेळात अनेकांचा बळी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
.......
लसीकरणाची कासवगती
श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य विभागाची दररोज १५ हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता आहे. पण लसीचा पुरवठा नियमितपणे होत नाही. त्यामुळे दररोज एक हजार नागरिकांना लस दिली जाते. लसीकरणाचा वेग वाढविला तर कोविडचा फैलाव रोखण्यास मदत होईल.
..........
सलाम सेवेला
लोणीव्यंकनाथ येथे कोविड सेंटर सुरु झाल्यानंतर राहुल गोरखे, अविनाश पांढरे, मिनीनाथ गोरखे हे विनामूल्य २४ रुग्णांच्या कामात व्यस्त आहेत. हे तिघेजण व्हिलचेअर वर रुग्णांना शौचालयास व आंघोळीसाठी नेतात. त्यांची सर्व सेवा निस्वार्थ करतात.
.......