वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:30+5:302021-04-23T04:22:30+5:30

सुमारे ३५ वर्षे त्यांनी पत्रकारितेत काम केले. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले तुपे हे दै. लोकसत्तामध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत ...

Senior journalist Ashok Tupe passes away | वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचे निधन

वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचे निधन

सुमारे ३५ वर्षे त्यांनी पत्रकारितेत काम केले. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले तुपे हे दै. लोकसत्तामध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत होते. पत्रकारितेत महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

समाजकारण, राजकारण, शेती आणि पाणी, या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण विपुल लिखाण केले. निर्भीड, तत्त्वनिष्ठ, स्पष्टवक्ता म्हणून ते परिचित होते. अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना सतत योग्य मार्गदर्शन करत असत. शेतीच्या प्रश्नांसंदर्भात, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लिखाणातून प्रयत्न केले. शनी शिंगणापूर देवस्थान, साईबाबा संस्थान याठिकाणी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन सेवा मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असत. वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक पत्रकारांशी त्यांचा नियमित संपर्क होता. दिलीप, विलास, किशोर तुपे यांचे ते भाऊ, तर अभिजित व निखिल तुपे यांचे ते वडील होत.

Web Title: Senior journalist Ashok Tupe passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.