मशिदीत सामुदायिक नमाज पठण; संगमनेरात २५ जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:28 IST2020-03-27T16:27:27+5:302020-03-27T16:28:24+5:30
मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठण करणाºया २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास नगर रस्त्यावरील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत असताना सदर कारवाई करण्यात आली. यावेळी सहा जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित पळून गेले आहेत.

मशिदीत सामुदायिक नमाज पठण; संगमनेरात २५ जणांविरोधात गुन्हा
संगमनेर : मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठण करणाºया २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास नगर रस्त्यावरील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत असताना सदर कारवाई करण्यात आली. यावेळी सहा जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित पळून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ही कारवाई केली आहे.
सलमान अब्दुल शेख (वय ३५, रा. इस्लामपुरा, संगमनेर), माजीद हारून शेख (वय ३३, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), आजीमखान नासीरखान खान (वय ३८, रा. रेहमतनगर, ता. संगमनेर), निजामुद्दीन फकीर मोहमंद तांबोळी (वय ५९, रा. करूले, ता. संगमनेर), चॉँद अब्बास पठाण (वय ६५, रा. मेंढवण, ता. संगमनेर), शोएब शाबीर खान (वय २२, रा, सुकेवाडी रस्ता, संगमनेर) अशी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नावे आहेत. मौलाना अकिल शकिर काकर, अलका फ्रुटवाला (नाव माहित नाही), सलीम मिश्री व इतर पळून गेलेले असे एकूण २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार बाळासाहेब मधुकर यादव यांनी फिर्याद दिली आहे.सहा जणांना पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणले असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक एन. डी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक माधव केदार, सहायक फौजदार बाळासाहेब यादव, राजेश गायकवाड, पोलीस नाईक शिवाजी डमाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे तपास करीत आहेत.