शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : लोणीची यंत्रणा परत पाठवा : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 16:27 IST

प्रत्येक तालुक्यात लोणीची २०० ते ३०० जणांची यंत्रणा फिरत आहे. त्यांना तीन महिन्यांपासून पगार नाहीत, ते येथे मतदारांची विचारपूस करतात. त्यांचेच बरे चालले आहे का?, हे त्यांनाच विचारा.

श्रीगोदा/जामखेड/कर्जत : प्रत्येक तालुक्यात लोणीची २०० ते ३०० जणांची यंत्रणा फिरत आहे. त्यांना तीन महिन्यांपासून पगार नाहीत, ते येथे मतदारांची विचारपूस करतात. त्यांचेच बरे चालले आहे का?, हे त्यांनाच विचारा. लोणीची ही यंत्रणा परत पाठवा. नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. हे ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीत दोघांमध्ये तिसरा स्वतंत्र पॅनेल तयार करतील, अशी टिका काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली.थोरात यांनी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी श्रीगोंदा, जामखेड, कर्जत येथे सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी विखे कुटुंबीयांवर टिकास्त्र सोडले.ते म्हणाले, माजी खासदार बाळासाहेब विखे व त्यांच्या कुटुंबीयांना खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद अध्यक्षपद दोन वेळा दिले. पण एकवेळ थोडे बाजूला केले की, यांचे रूप पक्षाला पाहायला मिळते. उमेदवारी लढविणाऱ्यांची भाषा कशी शांत असली पाहिजे. पण या मुलाची भाषा पाहून घेऊ, बघू अशी उध्दट आहे. आमचा संसार करण्यास आम्ही सक्षम आहोत. तिसऱ्याचे इथे काम नाही. याचा आम्हाला अनुभव आला आहे. त्यामुळे यांना परत पाठवा. यावेळी जिल्हाध्यक्ष करण ससाणे, राजेंद्र नागवडे, तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, रमेश आजबे, राहुल उगले, सावरगावचे सरपंच दादासाहेब ढवळे, ज्योती गोलेकर, विष्णू गंभीरे, जमीर सय्यद आदी उपस्थित होते.अहमदनगर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे निवडणूक प्रचारप्रमुख राजेंद्र नागवडे, जि.प. सभापती अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, दादासाहेब मुंडे, प्रशांत दरेकर, संजय डाके, ऋषिकेश भोयटे, भोस आदींची यावेळी भाषणे झाली. अ‍ॅड. अशोक रोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राहुल जगताप, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, घनश्याम शेलार, धनसिंग भोयटे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. सुनील भोस यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर