शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Satyajit Tambe: माझ्याविरुद्ध मोठं षडयंत्र रचलं, सत्यजित ताबेंनी आज सगळंच ओपन केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 17:08 IST

Satyajit Tambe: सत्यजित यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, माझ्याविरुद्ध मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचेही ते म्हणाले.

अहमदनगर - राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवला. त्यानंतर, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज म्हणजेच ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन मधल्या काळात झालेल्या राजकारणाचा पर्दाफाश केला. सत्यजित यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, माझ्याविरुद्ध मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांची बाजू घेत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली तर तांबे यांना सल्लाही दिला होता. त्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भूमिका मांडली. मात्र, सत्यजित तांबे यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उघडपणे नाव घेणं टाळलं पण प्रदेशाध्यक्ष म्हणत नाना पटोलेच या कारस्थानामागे होते, असेही त्यांनी एकप्रकारे सांगून टाकले. मी काँग्रेस पक्षातून बाहेर पडावं, अशीच काहीजणांची इच्छा होती. मला आणि माझ्या कुटुंबाला थोरात आणि तांबे परिवाराला बदनाम करण्याचा हा डाव होता, असे सत्यजित यांनी म्हटले. तसेच, मला काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी मी प्रयत्न करत होता. मी नानांकडे तशी विनंतीही केली होती. विशेष म्हणजे मी केंद्रीय नेतृत्त्वाकडे तशी विनंती केली, त्यांनी मला लिखीत पत्र देण्याचं सूचवलं. मी पत्रही दिलं. पण, पत्र दिल्यानंतर दोन तासांतच इकडे दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला

मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे, मला सर्वच पक्षांनी, सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला. म्हणूनच मी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे, मी यापुढेही अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. यापुढे मी सर्वच लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मांडणार आहे. सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षातील नेत्यांनाही मी गरजेनुसार भेटून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. मी सर्वांचे आभार मानतो, काँग्रेसवाले १०० टक्के माझ्याच सोबत होते, असेही सत्यजित यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सत्यजित तांबेंनी गेल्या १५ दिवसांत घडलेलं राजकारण व्यक्त करताना थेट नाना पटोलेंकडेच बोट दाखवले आहे. 

जाणीवपूर्वक औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म दिला

बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि मला उमेदवारी मिळू नये तसेच मला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठीच स्क्रिप्ट करण्यात आली होती असा गंभीर आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला. एबी फॉर्म देताना प्रदेश काँग्रेसने औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म पाठवावा ही जाणीवपूर्वक केलेली चूक होती असा आरोपही तांबे यांनी यावेळी केला. तसेच, याबाबत पक्षश्रेष्टींकडून काय कारवाई होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण पक्ष सोडलेला नाही, मात्र आमदार  अपक्ष असल्याचे तांबे म्हणाले.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNashikनाशिकElectionनिवडणूक 2024