सराफ व्यायसायिकाकडून चिपळूण येथील चोरीचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 13:07 IST2018-12-13T13:07:47+5:302018-12-13T13:07:50+5:30
शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाकडून चिपळूण पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दागिने सोन्याच्या सहा लगडी हस्तगत केल्याने शहरातील नागरिकात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

सराफ व्यायसायिकाकडून चिपळूण येथील चोरीचा मुद्देमाल हस्तगत
पाथर्डी : शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाकडून चिपळूण पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दागिने सोन्याच्या सहा लगडी हस्तगत केल्याने शहरातील नागरिकात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील बस स्थानकावरील मागील सहा महिन्यात प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरल्याबाबत चोरीच्या गुन्ह्यात पाथर्डी येथील संशयित आरोपी सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (रा.नाथनगर), आजिनाथ भगवान पवार (रा.भगवाननगर), ज्ञानदेव प्रभाकर बडे (रा. येळी, गणेश उर्फ संदीप दिनकर झिंजुर्डे, नागेश बारकू पवार (रा. विजयनगर), जगन्नाथ मुरलीधर वाघ (रा.जवखेडे खालसा) या आरोपींना ८ डिसेंबर रोजी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून चिपळूण येथील न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले. न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडीत देण्यात आली होती. आर. बी. चिंतामणी ज्वेलर्सचे मालक श्रीराम चंद्रकांत चिंतामणी यांना मुद्देमाल विकल्याचे आरोपींनी तपासादरम्यान सांगितले. चिपळूण पोलिसांनी बुधवारी चिंतामणी यांना तपासकामी ताब्यात घेवून गुन्ह्यातील सोन्याच्या दागिन्याची बनवलेल्या एकूण सहा लगडीचा पंचनामा करून ताब्यात घेतल्या. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार विनोद आबेरकर हे करत आहेत.