संजय चोपडा अखेर सेनेत
By Admin | Updated: July 24, 2014 00:17 IST2014-07-23T23:19:13+5:302014-07-24T00:17:18+5:30
अहमदनगर: माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी बुधवारी औरंगाबाद येथे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

संजय चोपडा अखेर सेनेत
अहमदनगर: माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी बुधवारी औरंगाबाद येथे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना एकदा भाजपाकडून, तर दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून महापालिका निवडणुकीत उमेदवारी करावी लागली होती. महापालिकेत ते दोनवेळा नगरसेवक होते.
चोपडा हे पूर्वीपासूनच आमदार अनिल राठोड यांचे समर्थक आहेत. चोपडा हे मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्याने महापालिका निवडणुकीत अपक्ष असलेल्या चोपडा यांचा भाजपाचे सुवेंद्र गांधी यांनी पराभव केला होता. आतापर्यंत चोपडा यांनी शिवसेनेचेच काम केले आहे. मात्र अधिकृतपणे त्यांनी बुधवारी औरंगाबाद येथे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, उपनेते आमदार राठोड, रवी बाकलीवाल, नफिसभाई चुडीवाल, रवी शेलार आदी उपस्थित होते. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा दिल्यानंतर त्याचे समाजाला लाभ मिळवून देण्याची ठाकरे यांनी चोपडा यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. जैन साधू-संत एका गावातून दुसऱ्या गावी जाताना त्यांना संरक्षण देण्याची मागणीही चोपडा यांनी ठाकरे यांच्याकडे केली. विदर्भातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ठाकरे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी चोपडा यांना सेनेत प्रवेश देण्यात आला. कोणतीही अटी-शर्तीवर प्रवेश घेतलेला नाही. आतापर्यंत युतीचेच काम केले आहे. मोठ्या आॅफर आल्या तरी युतीची साथ सोडली नाही,असे चोपडा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)