शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पोलिसांना धक्काबुक्की करुन वाळू तस्करांनी पळविला टेम्पो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:00 IST

प्रतापपूर गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करीत टेम्पोसह वाळू तस्कर पळून गेले. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करीत टेम्पोसह वाळू तस्कर पळून गेले. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई भागा धिंदळे यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.  शनिवारी (दि.१५) रात्रीची गस्त घालत होते. साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रतापपूर गावाच्या प्रवरा नदीपात्रात टेम्पोमध्ये चोरुन वाळू भरत असल्याची माहिती  मिळाली. आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना     भ्रमणध्वनीव्दारे मिळाली. त्यांनी रात्रीचा गस्तवर असलेले पोलीस शिपाई भागा धिंदळे व सरकारी वाहन चालक संदीप रोकडे यांना देऊन खात्री करण्यास सांगितला. प्रतापपूर शिवारातील नदीपात्रात जाऊन पाहणी करीत असताना टेम्पो (क्र. एम. एच.१४, ए. एस.३५२२) मध्ये वाळू भरत असलेल्याचे दिसले. यावेळी पोलिसांना पाहून वाळू तस्करांनी  टेम्पो  सोडून पळ काढला. पोलिसांनी  पाठलाग करुन रवींद्र उर्फ बंटी साहेबराव मदने (रा.आश्वी बुद्रुक), दत्तू सुभाष पवार, रवींद्र अजिनाथ रजपूत (रा.चंद्रपूर) या तिघांना पकडले. धनंजय  पंढरीनाथ ठाकुर, अजय विजय बरडे, मच्छिंद्र सोपान माळी पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी  टेम्पोसह तिघांना आश्वी पोलीस स्टेशनला आणत असताना प्रतापूर गावातील एसटी स्टँडजवळ टेम्पो थांबवला. आश्वीहून आलेल्या लखन साहेबराव मदने याने मोटरसायकल  आडवी लावत गाडीत बसलेले पोलीस शिपाई भागा धिंदळे यांना टेम्पोतून खाली उतरवत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर टेम्पोसह वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले.  आश्वी पोलिस ठाण्यात आरोपी लखन साहेबराव मदने  याच्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरriverनदीsandवाळूCrime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर