१४ व्या वित्त आयोगातून व स्थानिक विकास निधीतून ग्रामपंचायतीने हा प्लांट उभारला होता. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे, याकरिता ही योजना राबविण्यात आली होती. मुबलक पाणी नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा प्लांट बंद स्थितीत आहे. ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही येथील ग्रामपंचायतीने कोणताही प्रयत्नसुद्धा केलेला नाही. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या प्लांटचा ग्रामस्थांना कुठलाही फायदा होत नाही. त्यामुळे सध्या हा आरओ प्लांट गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडला आहे.
दोन-अडीच वर्षांपासून येथील ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना हा प्लांट सुरू करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडला नाही. शुद्धा पाण्याचा आरओ प्लांट कधी सुरू होईल याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांचे शुद्ध पाण्यासाठी हाल होत आहेत. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा मंजूरवासी करीत आहे.