नाट्य परिषदेच्या द्वितीय शाखेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:30+5:302021-01-15T04:18:30+5:30
नाट्य परिषदेच्या घटनेनुसार महापालिका क्षेत्रात तीन शाखांना कार्य करता येते. या नियमानुसार नगर शहरातील अनेक युवा कलाकार, नाट्य रसिक ...

नाट्य परिषदेच्या द्वितीय शाखेला मंजुरी
नाट्य परिषदेच्या घटनेनुसार महापालिका क्षेत्रात तीन शाखांना कार्य करता येते. या नियमानुसार नगर शहरातील अनेक युवा कलाकार, नाट्य रसिक यांनी या शाखेसाठी मागणी केली होती. नगर जिल्ह्यातील नाट्य चळवळ मागील अनेक वर्षांपासून बहरत आहे. राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गणपती व नवरात्रमधील व्यावसायिक नाट्य प्रयोग, विविध नाट्य प्रशिक्षण शिबिरे आणि नाट्यविषयक उपक्रमांबरोबरच चित्रपट निर्मिती, मालिका निर्मिती नगर शहरात होत आहे. या उपक्रमांमधून अनेक युवा कलाकार नगर शहरात निर्माण होत आहे. शहरातील रसिक वर्गसुद्धा वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील २२० नाट्य रसिकांनी एकत्र येऊन या शाखेची मागणी केली होती. या विनंतीला अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि मध्यवर्ती कार्यकारी समितीने मान्यता देऊन संक्रांतीनिमित्त गोड भेट दिल्याचे झावरे म्हणाले.
.................
नवीन शाखेची अस्थायी समिती
१२ जानेवारीला झालेल्या सभेनंतर अभय गोले यांच्या नावे हे मंजुरीचे पत्र संजय लोळगे यांना देण्यात आले. या नवीन शाखेची अस्थायी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आलेली असून, लवकरच सर्व कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यात येईल आणि नूतन कार्यकारिणीची स्थापना करण्यात येईल, असे झावरे यांनी सांगितले.