पंचायत समितीच्या पहिला मजला बांधकामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:37+5:302021-04-07T04:21:37+5:30

जामखेड येथील पंचायत समितीचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. पंचायत समितीतील वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच तळमजल्याच्या इमारतीत पार ...

Sanction for construction of first floor of Panchayat Samiti | पंचायत समितीच्या पहिला मजला बांधकामास मंजुरी

पंचायत समितीच्या पहिला मजला बांधकामास मंजुरी

जामखेड येथील पंचायत समितीचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. पंचायत समितीतील वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच तळमजल्याच्या इमारतीत पार पडतात. मात्र पंचायत समितीच्या कामाचा आणि विविध विभागाचा आवाका पाहता सध्या कार्यान्वित असलेली जागा अपुरी पडत आहे. आता या नियोजित पहिल्या मजल्याचे बांधकाम मूळ तळमजल्याच्या इमारतीवर करण्यात येणार आहे.

येथील पंचायत समितीच्या तळमजल्यात महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृहासह विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने तशी व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात येणार आहे. या बांधकामात ग्रीन संकल्पना, नैसर्गिक प्रकाश योजना व वायूवीजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे.

Web Title: Sanction for construction of first floor of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.