शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

साईदरबारी भाजपचा घंटानाद : ...अन्यथा टाळ, मृदुंग वाजवत ‘वर्षा’वर जावू; राधाकृष्ण विखे यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:51 IST

साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला.

शिर्डी : साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला.    सरकारला मंदिरे उघडण्यासाठी सद्बुद्धी द्यावी, यासाठी साईबाबांना साकडे घातले. मंदिरे उघडेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

माजीमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ़ सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली साईमंदिराच्या महाद्वारासमोर टाळ, मृदुंग, विणा वाजवत आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी गोंविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

देश अनलॉक होत असतानामंदिरे मात्र लॉकडाऊनच आहेत. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मंदिरे उघडण्याची गरज आहे. दारुची दुकाने, मॉल सुरू केलेत. बदल्यांसाठी मंत्रालय उघडले जाते. पण जनतेची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे बंद असल्याची टीका आमदार विखे यांनी केली़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील