शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

साईंच्या चर्म पादुका दक्षिण भारताच्या दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:39 IST

अधिकारी, सुरक्षारक्षक, मंदिरातील पुजारी असा २० कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : साईबाबा संस्थांच्यावतीने १० एप्रिलपासून २६ एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतील भाविकांच्या दर्शनासाठी पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील आठ शहरात साईंच्या चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी नेण्यात येत आहेत. शिर्डीतील साई मंदिरात या पादुकांची विधिवत पूजा करून साई संस्थान अधिकारी व सुरक्षारक्षकांसह या पादुका गुरुवारी रवाना करण्यात आल्या.

यावेळी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, प्रताप जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह संस्थानचे इतर अधिकारी उपस्थित होते.

साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो भाविक शिर्डीत येतात. मात्र ज्या भाविकांना शिर्डीला येता येत नाही, अशा अनेक भाविकांनी शिर्डी साईबाबा संस्थानला बाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, या राज्यातून भाविकांची यासाठी मोठी मागणी होती. साईबाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा तसेच भाविकांना साईंच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन मिळावे या हेतूने हा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

संस्थानची नियमावली

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या साईबाबांच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी बाहेर घेऊन जात असल्याने भाविकांना कशा पद्धतीने दर्शन देता येईल यासाठी संस्थानच्या वतीने नियमावली तयार करण्यात आली आहे. जेथे पादुका सोहळा आयोजित करण्यात आला, त्याच ठिकाणी पादुका ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही भाविकाच्या घरी या पादुका नेण्यात येणार नाहीत. तसेच या पादुका सोहळ्यासाठी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षक तसेच साई मंदिरातील पुजारी असा एकूण २० कर्मचाऱ्यांचा सोहळ्यात सहभाग असेल. शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जे नित्य कार्यक्रम होतात तसेच कार्यक्रम पादुका सोहळ्यादरम्यान होणार आहेत.

खंडपीठाच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यातील भाविकांची मागणी पाहता साईबाबांच्या मूळ चर्म पादुका घेऊन जाण्याचा निर्णय साई संस्थाच्या त्रिसदस्यीय कमिटीने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानवर त्रिसदस्यीय कमिटी नेमली आहे. या कमिटीत अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश हे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आहेत व जिल्हाधिकारी तसेच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कमिटीने साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी शिर्डी बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता साई संस्थानकडून करण्यात आली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

असा असेल साई पादुका दौरा सोहळा..

१० ते १३ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर व जिल्ह्यातील पेठ वडगाव.१४ ते १८ एप्रिल कर्नाटक राज्यातील दावनगेरे, मल्लेश्वरम येथे सहा दिवस.

१९ एप्रिल रोजी सायंकाळी तामिळनाडूकडे पादुका रवाना होतील.१९ ते २६ एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी.

२६ एप्रिल रोजी संध्याकाळी धर्मापुरी येथून साईंच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होतील. 

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर