साई व बालाजी मंदिराची दानपेटी फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 11:03 IST2019-09-26T11:03:37+5:302019-09-26T11:03:46+5:30

केडगाव येथील शाहूनगर परिसरातील साईबाबा मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

Sai and Balaji tear down the temple | साई व बालाजी मंदिराची दानपेटी फोडली

साई व बालाजी मंदिराची दानपेटी फोडली

अहमदनगर- केडगाव येथील शाहूनगर परिसरातील साईबाबा मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरीचा प्रकार कैद झाला आहे. चोरट्यांनी इतर सामानांची ही उचकापाचक केली. आज गुरुवार असल्याने सकाळी आरती असते. मंदिराची साफसफाई करण्यासाठी आलेल्या भाविकांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. ओमनगरमधील बालाजी मंदिराची दानपेटी ही चोरट्यांनी पळवली ती सकाळी केडगाव तलावानजीक आढळली.

Web Title: Sai and Balaji tear down the temple