कोळगाव येथील ग्रामीण रूग्णालयास मिळणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:18+5:302021-02-06T04:36:18+5:30
श्रीगोंदा : तीन वर्षांपासून रखडलेल्या कोळगाव येथील ग्रामीण रूग्णालयास मार्चअखेर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ...

कोळगाव येथील ग्रामीण रूग्णालयास मिळणार निधी
श्रीगोंदा : तीन वर्षांपासून रखडलेल्या कोळगाव येथील ग्रामीण रूग्णालयास मार्चअखेर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी राजेश टोपे यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामीण रूग्णालयाला परवानगी मिळाल्यानंतर २८ मे २०१८ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठविलेल्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यानुसार २१ जानेवारी २०२० रोजी अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र मार्च २०२० रोजी आलेल्या कोरोनामुळे निधी उपलब्ध झाला नसल्याने रूग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले होते. मागील ३ वर्षापासून रखडलेल्या ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आरोग्य मंत्री टोपे यांची कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी २ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन लक्ष वेधले. त्यांनी संबंधित विभागाला प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रूग्णालयासाठी मार्च २०२१ पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्याने कोळगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सुधीर लगड यांनी सांगितले.