नेवासा वगळता जिल्हाभर ऑक्सिजनसाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:52+5:302021-04-23T04:22:52+5:30
अहमदनगर : नेवासा तालुका वगळता जिल्हाभर ऑक्सिजन सिलेंडरसाठी खासगी, शासकीय रुग्णालयांच्या कोविड सेंटरच्या यंत्रणेसह कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी ...

नेवासा वगळता जिल्हाभर ऑक्सिजनसाठी धावाधाव
अहमदनगर : नेवासा तालुका वगळता जिल्हाभर ऑक्सिजन सिलेंडरसाठी खासगी, शासकीय रुग्णालयांच्या कोविड सेंटरच्या यंत्रणेसह कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. जवळपास सर्वच तालुक्यात मागणीपेक्षा कमी प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना इतरत्र हलवावे लागत आहे. कर्जतला तर काही खासगी कोविड सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजन नसल्याने डिस्चार्ज देण्याची वेळ डॉक्टरांवर आली. दोन दिवसापूर्वी ऑक्सिजन संपल्याने जामखेडचे काही रुग्ण नगर, बीडला हलविण्यात आले. पारनेरच्या प्रशासनाला ऑक्सिजनसाठी नगर, पुणे, नाशिक येथे संपर्क करावा लागत आहे, तरीही ऑक्सिजन मिळत नाही. श्रीरामपूर, शेवगाव, नगर तालुका, श्रीगोंदा, कोपरगाव, अकाेले, संगमनेर, राहाता आदी ठिकाणीही ऑक्सिजनची अशीच अवस्था आहे. ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे श्रीगोंदा येथे रुग्णांना जीवही गमवावा लागला आहे.