कर्जतला भाजपच्या बैठकीत रोहित पवारांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 18:25 IST2020-03-08T18:24:24+5:302020-03-08T18:25:06+5:30
माहीजळगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी (दि.९) होणा-या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख नसल्याने कर्जत भाजपच्या वतीने रविवारी आमदार रोहित पवार यांचा निषेध नोंदविण्यात आला.

कर्जतला भाजपच्या बैठकीत रोहित पवारांचा निषेध
कर्जत : माहीजळगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी (दि.९) होणा-या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख नसल्याने कर्जत भाजपच्या वतीने रविवारी आमदार रोहित पवार यांचा निषेध नोंदविण्यात आला.
रोहित पवार यांच्या पुढाकाराने सोमवारी माहीजळगाव येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित राहणार आहेत. या अभियानात राबविण्यात येणाºया विविध योजनांपैकी ८० टक्के योजना केंद्र सरकारच्या आहेत. येथे होणाºया महाराजस्व अभियानाचे नियोजन करताना केवळ केंद्राच्या योजनांचे श्रेय घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेखही केला नाही, असा कर्जत भाजपचा आरोप आहे.
रविवारी कर्जत येथे आयोजित बैठकीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांचा निषेध नोंदविला.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी अध्यक्ष अशोक खेडकर, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, युवा नेते स्वप्निल देसाई, सचिन पोटरे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, बापुराव गायकवाड, अल्लाउद्दीन काझी, धनंजय मोरे, अंगद रुपनर, पप्पू धोदाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.