करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:48 IST2020-08-26T14:47:41+5:302020-08-26T14:48:52+5:30

पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे मळ्यात रहात असलेल्या खुडे  वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला.

Robbery at Joharwadi in Karanji area; Looted four lakhs | करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला

करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला

करंजी : पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे मळ्यात रहात असलेल्या खुडे  वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला.

     जोहारवाडी गावापासून अर्धा किलोमीटरवर खुडे यांची वस्ती आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन अडीच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कोयंडा गजाच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात इंदू दिलीप खाडे, सुंदर रामभाऊ खुडे व अरुणा रामभाऊ खुडे अशा तिघी बहिणी झोपेत होत्या. यावेळी घरातील कपाटांची उचका-पाचक सुरू केली. घरातील समानांचा आवाज ऐकून या तिघी बहिणींना जाग आली. यांना जाग आल्याचे चोरट्यांना कळताच त्यांनी या तिघी बहिणींना कुºहाडीचा धाक दाखवून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातील फुले, अंगठी व मणीमंगळसूत्र ओरबडून घेतले. घरात दवाखान्यासाठी ठेवलेले अंदाजे २७ हजार रुपये असा एकूण साडेतीन  ते चार लाखांचा ऐवज लुटून नेला. 

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे, परमेश्वर जावळे यांनी घटनास्थळी भेट देवून ठसे तज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करुन माग काढण्याचा प्रयत्न केला. 
       

Web Title: Robbery at Joharwadi in Karanji area; Looted four lakhs