नगर येथील ठेकेदाराला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:21 IST2019-05-14T11:21:42+5:302019-05-14T11:21:52+5:30

पाच लाख रुपये न दिल्याने एमआयडीसी येथील कामगार ठेकेदाराला पाच जणांनी बेदम मारहाण करून रोख ५ लाख ६० हजार रुपये व सोन्याचे दागिने लुटून नेले़

The robber was robbed of the city | नगर येथील ठेकेदाराला लुटले

नगर येथील ठेकेदाराला लुटले

अहमदनगर : पाच लाख रुपये न दिल्याने एमआयडीसी येथील कामगार ठेकेदाराला पाच जणांनी बेदम मारहाण करून रोख ५ लाख ६० हजार रुपये व सोन्याचे दागिने लुटून नेले़
११ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास येथील एमआयडीसी येथे ही घटना घडली़ दत्तात्रय वसंत चौरे (वय ४५ रा़ गजवंदन कॉलनी, नवनागापूर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे़ चौरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पाटील, विशाल काटे, प्रफुल्ल पटेल व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला़ राहुल पाटील हा दोन महिन्यांपासून चौरे यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होता़ चौरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राग धरून आरोपींनी एमआयडीसी येथे त्यांच्यावर अचानक हल्ला केला़ त्यांना लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करून पाच लाख साठ हजार रुपये व त्यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चेन, पाच तोळे सोन्याचे कडे असा मुद्देमाल लंपास केला़

Web Title: The robber was robbed of the city