सिन्नरच्या महिला ठेकेदाराला लुटले;  दोन लाखांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:43 IST2020-10-04T13:42:21+5:302020-10-04T13:43:02+5:30

पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टरला सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवत दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यांना विरोध केला असता दोघांना काठीने बेदम मारहाण केली आहे.

Robbed Sinnar's female contractor; Two lakh jewelery lengthened | सिन्नरच्या महिला ठेकेदाराला लुटले;  दोन लाखांचे दागिने लांबविले

सिन्नरच्या महिला ठेकेदाराला लुटले;  दोन लाखांचे दागिने लांबविले

 टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टरला सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवत दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यांना विरोध केला असता दोघांना काठीने बेदम मारहाण केली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हॉटेल अभिषेकजवळ कच्च्या रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ धोत्रे बुद्रूक (ता.पारनेर,जि.अहमदनगर) येथे चंद्रकला गोपाल गवळी (वय ४०, लेबर कॉन्ट्रॅक्टर, मनेगाव, सिन्नर, जि. नाशिक) यांना आरोपी नामदेव उर्फ नामा व त्याचा मामा पंढरी उर्फ पंड्या तसेच त्यांचे अनोळखी सात ते आठ साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांना गवळी यांचा भाऊ अक्षय व बहिणीचा मुलगा दीपक यांनी प्रतिकार केला. परंतु त्यांना लाथाबुक्यांनी काठीने मारहाण करून दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिण्यांसह रोख रक्कम  लांबविली. 

याबाबतची फिर्याद चंद्रकला गवळी यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली  करीत आहेत.

Web Title: Robbed Sinnar's female contractor; Two lakh jewelery lengthened