व्यापाऱ्याला पाच लाखांला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:41+5:302020-12-13T04:34:41+5:30

कोपरगाव : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्यास लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून ...

Robbed the merchant of five lakhs | व्यापाऱ्याला पाच लाखांला लुटले

व्यापाऱ्याला पाच लाखांला लुटले

कोपरगाव : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्यास लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅगेत असलेले ४ लाख ९८ हजार ९०० रुपये रोख रकमेसह मोबाईल लुटून नेला आहे. कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाई-भाई गॅरेजसमोर शुक्रवारी (दि.११) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्यापारी दिलीप शंकर गौड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले की, कोपरगाव शहरातील किशोर वाईन्स हे दुकान सहा महिन्यांपूर्वी चालविण्यास घेतले आहे. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मी दुकान बंद करून दुकानातील दिवसभरात जमलेली रोख रक्कम ४ लाख ९८ हजार ९०० सोबत घेऊन आपल्या स्कूटीवरून घरी जात होतो. दुसऱ्या दुचाकीवर दुकानातील मजूर सचिन साळवे हे माझ्यासोबत होते. भाई-भाई मोटार गॅरेजसमोर आलो असता पाठीमागून विनानंबरच्या दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ९८ हजार ९०० रोख रक्कम एक टॅब व दोन मोबाईल तसेच कागदपत्रे असलेली बॅग लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे करीत आहे. याप्रकरणी व्यापारी दिलीप शंकर गौड (रा. निवारा, कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Robbed the merchant of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.