अहमदनगरमध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जेरबंद
By अण्णा नवथर | Updated: December 23, 2023 16:38 IST2023-12-23T16:37:25+5:302023-12-23T16:38:58+5:30
निंबळक येथील महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली.

अहमदनगरमध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा जेरबंद
अण्णा नवथर,अहमदनगर: निंबळक (ता. नगर ) येथील महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले असून, अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. अक्षय सुरेश कुलथे ( वय २३, रा. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे.
मागील रविवारी निंबळक येथील दत्तात्रय सोजीबा मुठे हे सुन पुजा व नात, असे तिघे दुचाकीवरून जात होते. पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या सुनेच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने ओरबडले. त्यानंतर चोरटे दुचाकीला लाथ मारून पसार झाले होते. त्यामुळे मुठे यांच्या त्यांची सून आणि नात दुचाकीवरून पडून जखमी झाले होते. त्यांच्या जबाबवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हा तपास सहायक पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा वरील आरोपीने केला असल्याचे समोर आले. आराेपी हा राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुरी येथे पोलिसांनी सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात यापूर्वीचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.