लव्ह जिहाद हिरवेकरणाचा परिणाम- सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:03 IST2023-06-07T14:03:21+5:302023-06-07T14:03:44+5:30

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी नगर दौऱ्यावर आले आहेत.

Result of Love Jihad Greening- kirit Somaiya | लव्ह जिहाद हिरवेकरणाचा परिणाम- सोमय्या

लव्ह जिहाद हिरवेकरणाचा परिणाम- सोमय्या

महाविकास आघाडीच्या काळात हिरवेकरण करण्याची  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत स्पर्धा सुरू होती. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. राज्यात लव्ह जिहादच्या घटना वाढल्या आहेत, अशी टिका भाजपाचे माजी खासदार किरट सोमय्या यांनी केली.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हयातील लव्ह जिहाद प्रकरणांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, की अहमदनगर जिल्ह्यात लव्ह जिहादची सर्वाधिक प्रकरणे असून, अतापर्यंत  सात प्रकरणे समोर आलेली आहेत.

संबंधित पिडित कुटुंबियांची भेट घेतली. हा प्रकार गंभीर असून, अल्पवयीन मुली बळी पडत आहेत. प्रशासनाची झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून, याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येतील, असेही सोमय्या म्हणाले.

Web Title: Result of Love Jihad Greening- kirit Somaiya