केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:25+5:302020-12-05T04:36:25+5:30

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा ...

Repeal the Central Agriculture Bill | केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा

केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, नगरसेवक हिरालाल पगडाल, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, सुभाष सांगळे, गणपत सांगळे, कैलास पानसरे, निर्मला गुंजाळ, उबेद शेख, प्रा. बाबा खरात, माणिक यादव, आनंद वर्पे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे आदीं उपस्थित होते.

केंद्रीय कृषी व कामगार विधेयके अत्यंत जाचक व सर्वसामान्यांच्या विरोधी आहेत. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये केंद्राने लादलेल्या या कायद्याविरोधात संतापाची लाट आहे. यासाठी हरियाणा व पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून या कायद्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले असून आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांची सन्मानाने चर्चा करण्याऐवजी केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने त्यांच्यावर अश्रुधूर, नळकांडे व लाठीचार्ज करत आहे, त्याचे निंदनीय आहे. जगाच्या पोशिंद्यालाही अपमानास्पद वागणूक दिली जात असून ही लोकशाहीची थट्टा आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

शिवाजी जगताप, शेखर सोसे, माणिक यादव, भास्कर शेरमाळे, आनंद वर्पे, रमेश गुंजाळ, स्वाती मोरे, हैदर सय्यद, बाळासाहेब पवार, अ‍ॅड. त्र्यंबक गडाख, भाऊसाहेब शिंदे, तात्याराम कुटे, अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, बी. आर. चकोर, दत्तू कोकणे, नवनाथ आंधळे, सोमनाथ सोनवणे, विलास कवडे, विलास वर्पे, शिवाजी खुळे, सौदामिनी कानोरे उपस्थित होते. नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले.

-------

फोटो नेम : ०३संगमनेर

ओळ : काँग्रेसच्या वतीने संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता परिसरात आंदोलन करण्यात आले.

Web Title: Repeal the Central Agriculture Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.