कोरोना काळात प्रशासनाचे उल्लेखनीय कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:34+5:302021-06-22T04:15:34+5:30
केडगाव : कोरोनाच्या काळात नगर तालुक्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यासह सर्वच विभागातील प्रशासनाने उल्लेखनीय कार्य केले, असे मत जेऊर ...

कोरोना काळात प्रशासनाचे उल्लेखनीय कार्य
केडगाव : कोरोनाच्या काळात नगर तालुक्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यासह सर्वच विभागातील प्रशासनाने उल्लेखनीय कार्य केले, असे मत जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले यांनी व्यक्त केले. धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या कार्याची दखल घेत जेऊर येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला. यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाचे डॉ. योगेश कर्डिले व डॉ. सुप्रिया थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब तागड यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. सुप्रिया थोरबोले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे, आरोग्य कर्मचारी भाऊसाहेब जावळे, दुर्गा बनसोडे, आशा सेविका इंदू दानवे, माधुरी कातोरे, किशोर शिकारे, लक्ष्मण विरकर, सोपानराव शिकारे, बाळासाहेब शिकारे, अण्णासाहेब कातोरे, किसनराव मंचरे उपस्थित होते.