रेखा जरे हत्या प्रकरण; सागर भिगारदिवे, ऋषिकेश पवार या दोघांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 10:30 IST2020-12-03T10:27:15+5:302020-12-03T10:30:16+5:30

अहमदनगर  : सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.   

Rekha Jare murder case; Sagar Bhigardive and Rishikesh Pawar were arrested by the police | रेखा जरे हत्या प्रकरण; सागर भिगारदिवे, ऋषिकेश पवार या दोघांना पोलिसांनी केली अटक

रेखा जरे हत्या प्रकरण; सागर भिगारदिवे, ऋषिकेश पवार या दोघांना पोलिसांनी केली अटक

अहमदनगर  : सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.   

त्मयाध्ये सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी अजित पाटील  यांनी दिली. दोघांना दुपारी पारनेर न्यायालयात हजर करणार आहेत.

 रेखा जरे यांची सोमवारी नगर- पुणे रोडवर जातेगाव फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती. या आधी तीन जणांना काल अटक करण्यात आली होती. आता आणखी दोघांना अटक झाल्याने अटक केलेल्याची संख्या पाच झाली आहे. आता या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ? याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Rekha Jare murder case; Sagar Bhigardive and Rishikesh Pawar were arrested by the police