पतंगाचा विक्रम

By Admin | Updated: October 5, 2014 23:56 IST2014-10-05T23:50:23+5:302014-10-05T23:56:03+5:30

अहमदनगर : म्हैसूर आंतरराष्ट्रीय दसरा महोत्सवात भिंगार येथील दीपक हरके यांनी सादर केलेला डेल्टा डायमंड काईटस् सर्वात मोठा पतंग ठरला

Record of moth | पतंगाचा विक्रम

पतंगाचा विक्रम

अहमदनगर : म्हैसूर आंतरराष्ट्रीय दसरा महोत्सवात भिंगार येथील दीपक हरके यांनी सादर केलेला डेल्टा डायमंड काईटस् सर्वात मोठा पतंग ठरला असून, त्यांना विश्वविक्रमाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे़ म्हैसूर आंतरराष्ट्रीय दसरा महोत्सव समिती व टुरिझम आॅफ कर्नाटका यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़
या महोत्सवात हरके यांनी ५१ फुट उंच व २३ फुट रूंद डेल्टा डायमंड काईट बनविली होती़ बांबुपासून बनविण्यात आलेल्या या पतंगावार महिला सशक्तीकरणाची संकल्पना मांडली होती़ जगभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे चित्र या पतंगावर लावण्यात आली होती़
वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस्चे अध्यक्ष पवन सोलंकी यांनी या पतंगाची मोजणी करून ही जगातील सर्वात मोठी डायमंड डेल्टा काईट असल्याची घोषणा केली़ हरके यांना टुरिझम आॅफ कर्नाटकाच्या प्रतिनिधी ब्रम्हाकुमारीज यांनी प्रमाणपत्र प्रदान केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Record of moth