नेवाशात साध्या पद्धतीने राम जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:36+5:302021-04-23T04:22:36+5:30
नेवासा : शहरातील जुन्या पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साध्या पद्धतीने सामाजिक अंतराचे पालन करत साजरा करण्यात आला. ...

नेवाशात साध्या पद्धतीने राम जन्मोत्सव
नेवासा : शहरातील जुन्या पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साध्या पद्धतीने सामाजिक अंतराचे पालन करत साजरा करण्यात आला.
कोरोनामुळे दरवर्षी होणारे कीर्तन महोत्सवाचे कार्यक्रम, कथा यंदा रद्द करण्यात आल्या होत्या. यावर्षी मुख्य दर्शन दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. मंदिरातील रामाच्या मूर्तीसह लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्तींस अभिषेक घालण्यात आला.
अंकुश लवडकर, अभिजित लवडकर, अक्षय लवडकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यंदा झेंडा मिरवणूक न काढता मंदिरावर ध्वज लावण्यात आला.
यावेळी कृष्णा डहाळे, अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, भाऊसाहेब येवले, राजेंद्र काळे, राहुल आठरे, शिवा राजगिरे, अंकुश पंडुरे उपस्थित होते.