प्रतिकूल परिस्थितीतही राखी बगळ्याची वंशवृद्धी!
By Admin | Updated: May 11, 2014 00:54 IST2014-05-11T00:49:48+5:302014-05-11T00:54:56+5:30
बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील भीमा, घोड, कुकडीच्या ग्रीन झोनमधील जुन्या मोठ्या वृक्षांवर राखी बगळ्यांनी समूह पद्धतीने वसाहती थाटल्या आहेत.

प्रतिकूल परिस्थितीतही राखी बगळ्याची वंशवृद्धी!
बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील भीमा, घोड, कुकडीच्या ग्रीन झोनमधील जुन्या मोठ्या वृक्षांवर राखी बगळ्यांनी समूह पद्धतीने वसाहती थाटल्या आहेत. या बगळ्यांच्या वसाहती सध्या श्रीगोंद्याचे प्रमुख आकर्षण बनले आहे. प्रतिकूल परिस्थितीत राखी बगळ्याची वंशवृद्धी होत आहे, ही बाब पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीने आनंदाचे कारण ठरली आहे राखी बगळा सारंगकुळातील पक्षी असून, हा पक्षी इंग्रजीत ‘ग्रेहेरॉन’ तर संस्कृतमध्ये ‘अंजन’ नावाने ओळखला होता. राखी बगळा भारतातील प्रमुख नद्यांच्या खोर्यात आढळत असला तरी या पक्षाची सर्वात मोठी वसाहत श्रीगोंद्यातील पेडगाव येथे असल्याची नोंद आहे. त्यामुळे राखी बगळा श्रीगोंदेकरांचे वैभव समजले जाते.