कोपरगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वारी केंद्रातील १७ शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी वेशभूषा वक्तृत्व ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महापुरुषांची वेशभूषा परिधान करून त्यांचे उपदेशपर वाक्य बोलून त्याचा व्हिडिओ तयार करून ग्रुपवर पाठवायचा होता.
या स्पर्धेत वारी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीतील राजवर्धन रोहित टेके याने माजी पंतप्रधान पंडित जावहारलाल नेहरू यांची वेशभूषा परिधान करून त्यांचे उपदेशपर वाक्य बोलून दाखविले होते. या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून राजवर्धन याचा वारी केंद्रात तिसरा तर वारी शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, विस्तार अधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख विलास भांड, मुख्याध्यापक सुकदेव कराळे, छाया वडनेरे, दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले.
......