शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री किताबचा राज बागवान मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:48 IST2019-09-14T17:47:34+5:302019-09-14T17:48:42+5:30

अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भोला हेल्थ क्लबच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेत राज बागवान याने ‘अहमदनगर महोत्सव श्री’चा किताब पटकाविला़ 

Raj Bagwan Mannari, Shri Ketab in the Bodybuilding competition | शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री किताबचा राज बागवान मानकरी

शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री किताबचा राज बागवान मानकरी

अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भोला हेल्थ क्लबच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेत राज बागवान याने ‘अहमदनगर महोत्सव श्री’चा किताब पटकाविला़ 
 भोला फिटनेस श्री-किरण पटकुळे, सय्यद बुºहाण श्री-मान सद्दाम शेख तसेच हक्युर्लेस श्री चा किताब जहीर शेख यांनी मिळवला. मोस्ट इम्प्रुमेंट शहेबाज शेख व बेस्ट पोझर तय्यब शेख ठरले. यावेळी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर विशाल कांबळे व महेश गोसावी यांनी बॉडी शो करुन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना  बुºहाण सय्यद व वाल्मिक अण्णा कुटे यांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ यावेळी भोला हेल्थ क्लबचे संचालक  व स्पर्धेचे आयोजक जावेद सय्यद, शहा फैसल सय्यद, रजा सय्यद, जावेद शेख, अय्याज बागवान, मुजफ्फर शेख, मुन्नवर दारुवाला, शोएब शेख, किरण देशमुख, शाहरुख सय्यद, बबलू शेख, रमीज शेख, सलमान खान, गौस शेख, अशकान शेख, शहानवाझ शेख, आरिफ पठाण, बोबो सय्यद, अक्षय केंजरला आदी उपस्थित होते.
 स्पर्धेचे परीक्षण राष्ट्रीय परीक्षक माजी प्राचार्य डॉ. जयंत गीते, महेश सातपुते, विक्रम भोगाडे, दत्ता रणसिंग, अ‍ॅड. नाना रोकडे, संजय सुरवसे, नाना गवळी, अभय हलवाई, केतन देशमुख, जेम्स ससाणे, तौसिफ शेख, सागर येवले, अर्जुन जावळे, नितीन पारखे, लेडिज फिटनेसच्या अध्यक्ष विश्रांती आढाव, अंकित गीते, मयुर गीते यांनी केले.

Web Title: Raj Bagwan Mannari, Shri Ketab in the Bodybuilding competition